मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > सण
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गणपती विसर्जन पूजा
वेबदुनिया
गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे.

विधी: पूजा करण्‍यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी.

पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत. पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवावे.

पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
मंत्र: 'हे दीप देवा! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित रहावे.'
(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)

खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा....(हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडा)

पवित्रीकरण
पवित्रीकरण पूजेसाठी खालील मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करणाने पावित्र्य प्राप्त करू शकतो.'
'भगवान पुंडरीक्षा मला पावित्र्य प्रदान कर.'

श्री गणेशाचे ध्यान
ध्यान मंत्र: (प्रणाम करून म्हणा) सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत, त्याला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत.

त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! तुला प्रणाम करतो.

स्नान, पंचामृत स्नान:
विधी: पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने तुला स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर'.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरेनेयुक्त पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर.'
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा.

गणपतीची ऑनलाईन आरती
1 | 2 | 3  >>  
फोटो गॅलरी
विघ्नहर्त्याच्या चित्रदालनात प्रवेशासाठी येथे क्लिक करा...
आणखी
आली गौराई अंगणी
गणपती वंदन
गणाना त्वां गणपती
परमतत्व गणेश
गणपती रहस्य
इच्छित फळ देणारा गणेश