मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > सण
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अक्षय तृतीयेचे महत्त्व

akshay turtiya
WD
अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे
* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय तृतीयेचे माहात्म्
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.

akshay trutiya
WD
अक्षय तृतीयेची व्रत कथा
प्राचीन काळात सदाचारी व देव-ब्राह्मणांत श्रद्धा ठेवणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता. त्याचे कुटुंब फार मोठे होते. त्यांचे पालन पोषण करणे त्याला जिकीरीचे जात होते. त्याने एकदा एका व्रताचे माहात्म्य एकले. नंतर जेव्हा हा सण आला त्याने गंगेत स्नान करून विधीपूर्वक देवदेवतांची पूजा अर्चना केली. लाडू, पंखा, पाण्याने भरलेले हंडे, जवस, गहू, मीठ, सातू, दही, तांदूळ, गुड, सोने आणि वस्त्र इत्यादी वस्तू ब्राह्मणांना दान दिल्या. त्याच्या पत्नीने त्याला असे न करण्यास वारंवार सांगितले. पुढे म्हातारपणी अनेक रोगांनी तो ग्रस्त झाला तरीही धर्म-कर्म आणि दान करतच राहिला. याच वैश्याने पुढील जन्मी कुशावती राजा म्हणून जन्म घेतला. अक्षय तृतीयेच्या व्रत पालनामुळेच त्याला है वैभव मिळाले. वैभवसंपन्न झाल्यावरही त्याने या व्रताचे पालन केले.
आणखी
रथसप्तमी
श्रीसूर्यस्तुति
संक्रांतीचं वाण
नात्यांचा पतंग उंच विहरू द्या!
तिळगूळ घ्या गोड बोला
संक्रांतीचा धार्मिक पैलू