शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

भारतासाठी आज जिंकू किंवा मरू स्थिती

PR
दुसरा एकदिवसीय सामना

पहिल्याच सामन्यात जोहान्सबर्गच नू वॉन्डर्स स्टेडियमवर 141 धावांनी पराभव पत्करणार्‍या टीम इंडिया यापुढे जिंकू किंवा मरू अशी स्थिती निर्माण झाली आहे. रविवार, 8 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत संघात दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जात आहे.

तीन झटपट सामन्यांच्या मालिकेत पहिली दिवस रात्रीची लढत जिंकून दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांनी अर्धशतके ठोकली तर सलामीचा क्विन्टॉन डी कॉक याने तडफदार असे शतक ठोकले. याउलट भारताचे फलंदाज गडगडले. कर्णधार धोनीने सर्वाधिक धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांना नव्या चेंडूचा व्यवस्थित वापर करता आला नाही, अशी खंत कर्णधार धोनीने व्यक्त केली होती. वॉन्डर्सची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी असताना भारताच्या गोलंदाजांना व्यवस्थित मारा करता आला नव्हता.

त्यामुळे भारताला या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा दुसरा सामना जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिका खिख्यात घालण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्र, अंबाटी राडू, अजिंक्य राहाणे.

दक्षिण आफ्रिका : ए.बी. डिव्हिलिअर्स (कर्णधार), हाशीम आमला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), जे.पी. ड्युमिनी, इम्रान ताहीर, जॅक कालिस, मॅक्लॅरेन, मोर्ने मोरकेल, वेन पारनेल, व्हेरनॉन फिलँडर, ग्रॅमी स्मिथ, डेल स्टेन, लोनवाबो सोटसोबे.