शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , शनिवार, 28 जुलै 2012 (17:05 IST)

भारतीय तिरंदाजी पुरुष संघ ऑलिंपिकमधून बाहेर

ऑलिंपिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय तिरंदाजी पुरुष संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. लॉर्डस क्रिकेट मैदानावर झालेल्या तिरंदाजीच्या सामन्यात आज (शनिवार) भारतीय संघाचा उप-उपांत्यपूर्व फेरीत जपानने पराभव केला.

जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी आणि तरूणदीप राय यांचा समावेश असलेला भारतीय संघ शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात बाराव्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे भारताला आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी जपानचा पराभव करणे गरजेचे होते. मात्र, जपानने भारताचा २९-२७ असा पराभव केला. जपानच्या संघातील यू इशिझू,हिडेकी किकुची आणि ताकाहारू फुरूकावा यांनी भारताचा पराभव केला. सांघिक प्रकारात अपयश आलेले भारतीय खेळाडू आता सोमवारपासून सुरु होणाऱ्या वैयक्तिक स्पर्धेत किती यश मिळवितात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.