गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: सावो पावलो , शुक्रवार, 20 जून 2014 (10:57 IST)

सुआरेजना वाचवली उरुग्वेची लाज, इंग्लंडवर २-१ने मात

लुईस सुआरेजच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे उरुग्वेने इंग्लंडला 2-1 हून पराभव करत फक्त विश्वचषकमध्ये त्यांच्या शक्यतेला कमी केले आहे बलकी टूर्नामेंटमध्ये स्वत:ला कायम ठेवण्यात यशस्वी देखील झाले आहे. 
 
गेल्या महिन्यात गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेला उरुग्वेचा लुईस सुवारेझ पुन्हा मैदानावर परतला होता. मात्र कोस्टा रिकाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो मुकला होता. या सामन्यात त्यांना कोस्टारिकाकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला होता. गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेचा फॉरवर्ड प्लेअर लुईस सुवारेझ संघात परतला. लुईसने ३९ पहिला गोल करुन उरुग्वेचे खाते उघडले.   ७७ व्या मिनीटाला इंग्लंडचा स्ट्रायकर रुनीने एक गोल मारुन इंग्लंडला बरोबरीत आणले होते. सामना बरोबरीत सुटेल अशी चिन्हे असतानाच ८५ व्या मिनीटाला लुईसने पुन्हा एकदा गोल करुन संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. 
 
दरम्यान, गुरुवारी ग्रुप सीमध्ये जपान विरुद्ध ग्रीस हा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.