भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानावर होणारे युद्धच जणू. चित्तथरारक, श्वास रोखून धरायला लावणारे, ह्रदयाची धडधड वाढविणारे अशी विशेषणे म्हणूनच या सामन्यांना लागतात. नुकत्याच संपलेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात हा थरार अगदी याच शब्दांत आपल्याला अनुभवायला मिळाला. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. यावेळी रणभूमी आहे भारत.
या दोन्ही संघादरम्यान तीन कसोटी व पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हा संपूर्ण थरार वेबदुनिया आपल्या वाचकांपर्यंत पोहोचविणार आहे. अगदी क्षणाक्षणाची माहिती वाचकांना यातून मिळेल. या सामन्यांचा प्रत्येक चेंडूनिहाय धावफलक वाचकांना नऊ भाषांमध्ये वाचायला मिळणार आहे. या मैदानी युद्धाच्या तारखा कोणत्या याकडे मात्र नीट लक्ष द्या आणि त्यादिवशी लॉगऑन करा http://marathi.webdunia.com/ ला.
भारत- पाक सामन्यांचे वेळापत्रक
सामना - स्थळ - वेळ 1. पहिला एकदिवसीय सामना - गुवाहाटी - 09.00 सकाळी 2. दुसरा एकदिवसीय सामना - मोहाली - 02.30 दुपारी 3. तिसरा एकदिवसीय सामना - कानपुर - 09.00 सकाळी 4. चौथा एकदिवसीय सामना - ग्वाल्हेर - 02.30 दुपारी 5. पांचवा एकदिवसीय सामना - जयपूर - 02. 30 दुपारी
|