मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शोएब वरील बंदी एक महिन्यासाठी रद्द
पाकची रावळपिंडी एक्सप्रेस आता भारतात होणार्‍या आयपीएल सामन्यातही खेळू शकले. पाक क्रिकेट नियामक मंडळावर त्याने केलेल्या आरोपांवरून त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी न्यायालयीन समितीने एक महिन्यांसाठी रद्द केली असून, आता भारतीय प्रेक्षकांना शोएबच्या भेदक गोलंदाजीचा आनंद मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि पीसीबी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्याने पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने याची गंभीर दखल घेत पीसीबीने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती.

पीसीबी जोपर्यंत त्याच्यावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत तो आयपीएलमध्येही खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. आता त्याच्यावरील बंदी न्यायालयाने एक महिन्यांसाठी रद्द केल्याने तो आयपीएलमध्ये खेळू शकेल.
आणखी
तर मी संन्यास घेणार- हार्मिसन
जॉन राईट म्हणतात,चापट पाहू नका
शोएबविरूद्ध अश्रफ यांचा मानहानीचा दावा
अर्थमंत्री विचारतात 'क्रिकेट म्हणजे काय?'
शोएबला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी
शोएबने पीसीबीची माफी मागितली