टी-20 आणि भारतात सुरू झालेल्या इंडियन प्रिमीयर लिग सामन्यांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ अर्थात आयसीसीवर चांगलाच दबाव निर्माण झाला आहे.
एकीकडे भारतात आयपीएल सामन्यांना प्रचंड लोकप्रीयता मिळत असताना, क्रिकेटच्या या नव्या रूपामुळे कसोटी क्रिकेटचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे आयसीसीला वाटते. यातच कसोटी क्रिकेटकडे आता खेळाडूंनीही पाठ सुरू केल्याने कसोटी सामन्यांचे अस्तित्व टिकवण्याची कवायत आयसीसीला करावी लागत आहे.
आयपीएल सामन्यांना भारतच नाही तर जगभरातूनही अमाप लोकप्रीयता मिळत असल्याने या सामन्यांचा समावेश आयसीसीने आपल्या नोंदीत करावा असा त्यांच्यावर दबाव वाढत आहे.
|