सध्या पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाला जबरदस्त फटका बसत असून,एकट्या ऑस्ट्रेलियाने सुरक्षिततेच्या कारणांवरून पाक दौरा रद्द केल्याने पीसीबीचे ८४ कोटीचे नुकसान झाले आहे.
पाकसंसदेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत पीसीबीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिल्यानंतर सरकारचेही धाबे दणाणले आहेत.
पाकमध्ये 2004 पासून सुरू असलेल्या अस्थिर वातावरणाने आतापर्यंत अनेक देशांनी पाक दौर्यावर येण्यास नकार दिला आहे.
ऑस्ट्रेलियन दौरा रद्द झाल्याचा चांगलाच झटका पीसीबीला सहन करावा लागत असून, येणार्या काळात आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि भारताच्या पाक दौर्याने हे नुकसान भरून निघण्याची आशा आता पीसीबीला वाटते आहे.
|