'श्री'मुख नाट्याची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नियुक्त केलेले अधिकारी सुधीर नानावटी यांच्यासमोर सुनावनीसाठी हरभजन सिंग व श्रीसंत पोहचले आहेत.
गुजरात कायदा समितीच्या इमारतीत दोन वाजता सुनावणीस सुरूवता होईल. मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने श्रीशांतला थापट मारली होती. घटनेची चित्रफीत बघून आपणांस धक्का बसल्याचे नानावटी यांनी स्पष्ट केले होते.
सामनाधिकारी फारूख इंजिनिअर यांनी हरभजनला दोषी ठरवल्यानंतर इंडियन प्रिमियर लीगच्या उर्वरित सामन्यास खेळण्यास हरभजनवर बंदी घालण्यात आली आहे. नानावटी यांनी सामन्याचे पंच व इंजिनिअर यांचे वक्तव्य अगोदरच नोंदवले आहे. मंडळाच्या शीस्तपालन समितीस मदत करण्यासाठी नानावटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या कलम 32 नुसार अध्यक्षास याबाबत नियुक्तीचा अधिकार आहे. नानावटी यांच्या अहवालाचा मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभ्यास केल्यानंतर शीस्तपालन समितीसमोर मांडण्यात येईल.
|