ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्तीगत कारणासाठी वेस्ट इंडीज दौर्यातून माघार घेतली आहे. ब्रिस्बेन येथे संघाचा प्रशिक्षण वर्ग सुरू असून क्लार्कने येथून सिडनीसाठी प्रयान केल्याचे वृत्त आहे. सिडनीत क्लार्क कुटुंबीयांचे वास्तव्य असून त्याची वाग्दत्त वधू लारा बिंगलही येथलीच.
क्लार्कच्या वडिलांना हॉजकिंन्स आजार जडला असून बिंगलचे वडीलही लिव्हर कँसरशी झगडत आहेत. क्लार्क ऐवजी संघात व्हिक्टोरीयाच्या ब्रॅड हॉजची निवड करण्यात येईल. ऑस्ट्रेलियाचा संघ शनिवारी विंडीज दौर्यावर रवाना होईल.
|