मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अँड्र्यू फ्लिंटॉफ पुनरागमनासाठी उत्सुक
भाषा
इंग्लंडचा अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफने पुनरागमनासाठी सज्ज असून परत एकदा देशासाठी खेळण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. लँकेशायरकडून खेळताना त्याने या हंगामात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले असून घोट्याच्या दुखापतीतून तो पुर्णपणे बरा होत असूनलॉर्ड्सवर
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटीत खेळण्याची तो प्रतीक्षा करत आहे.

भूतकाळात पुष्कळशे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. मात्र आता खेळण्याबाबत आपणास विश्वास आहे. गोलंदाजी सुरेख होत असून घोट्याचा कोणताही त्रास जाणवत नाहीये. दरम्यान माजी संघ सहकारी मार्क ट्रेस्कोथिकने फ्लिंटॉफला थेट संघात घेण्याचा आग्रह धरला आहे.

त्याची गोलंदाजी सुरेख होत आहे मात्र चिंता आहे ती फलंदाजीची डर्बनविरूद्ध तो सलग तीनदा शून्यावर बाद झाला. निवडकर्त्यांशी सतत संर्पकात असून नेट सरावात चेंडूचे उत्तम टायमिंग करत असल्याने त्याने स्पष्ट केले.
आणखी
क्लार्कची वेस्ट इंडीज दौर्‍यातून माघार
श्रीसंत व हरभजन सुनावणीसाठी पोहचले
पीसीबीला ८४ कोटीचा फटका
सुनील गावसकर यांचा आयसीसीचा राजीनामा
आता आयसीसीचीच 'कसोटी'
'श्री' मुख नाट्य बघून नानावटींना धक्का