मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीशांतऐवजी गोनीला संधी  Search similar articles
भाषा
बांगलादेशात होणार्‍या आगामी एकदिवसीय त्रिकोणीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय जलदगती गोलंदाज श्रीशांतऐवजी पंजाबच्या मनप्रीत गोनीचा संघात समावेश करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) निरंजन शहा यांनी पत्रकारांना सांगितले.

इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेदरम्यान श्रीशांत जखमी झाल्यामुळे त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला डॉ. किंजा यांनी दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत गोनीने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला.

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याने 26.05 च्या सरासरीने 16 सामन्यात 17 गडी बाद केले होते. यापूर्वी अष्टपैलू युसूफ पठाण आणि हैद्राबादचा फिरकी गोलंदाज प्रयाग ओझा समावेश करण्यात आला आहे.
आणखी
पठाण कु‍टुंबियांचा आशियाना
पीसीबीनेही सोडली आसिफची साथ?
पठाणचा दीड कोटींचा बंगला
सचिन कसोटी रॅकींगमध्ये चौदाव्या स्थानी
ब्रेट ली उतरला बेकहॅमच्या स्पर्धेत
हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये इंजमाम खेळणार