इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार पद भूषवून शानदार प्रदर्शन करणार्या अष्टपैलू शेन वॉर्नला ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी जास्त काळ न मिळाल्याचे दु:ख वाटत नसल्याचे वॉर्नने सांगितले.
मी ऑस्ट्रेलिया संघाच्या अनेक चांगल्या कर्णधारांबरोबर खेळलो असून मला त्यांचा चांगला अनुभव आहे. 1999 मध्ये विश्वकप विजेत्या संघाचा उपकर्णधार म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. काही एकदिवसीय सामन्यांसाठी देखील मी कर्णधार म्हणून काम केले आहे. म्हणून मला त्याचे दु:ख वाटत नसल्याचे त्याने सांगितले.
|