आंतराष्ट्रीय सामन्यात खेळण्यासाठी विश्रांती आवश्यक नाही, ऑस्ट्रेलियासाठी सतत खेळत असलेल्या ब्रेट लीने 'आराम हराम असल्याचे सांगितले.
2005 च्या एशेज मालिकेत ली संघात बारावा खेळाडू म्हणून खेळाडूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याचे काम केल्याचे त्याला आजही आठवते. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राथने निवृत्ती घेतल्यानंतर ब्रेट लीवर गोलंदाजीची अधिक जबाबदारी पडली असून वाढत्या दबावामुळे कर्णधार रिकी पॉन्टींगदेखील चिंतेत आहे.
संघाबाहेर बसण्यापेक्षा गोलंदाजीचा भार सांभाळायला मी तयार असल्याचे ली ने सांगितले. मला संघाबाहेर बसणे अजिबात आवडत नसून ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक सामना मी आवडीने खेळतो. आज क्षणाला स्पर्धा वाढली असून मला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही.
|