इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) ट्वेंन्टी-20 स्पर्धेनंतर ढाका येथे होणार्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया लवकरच एकरूप होईल, असा आत्मविश्वास भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केला आहे.
भारताचा परंपरांगत शत्रू पाकिस्तानबरोबर मंगळवारी दुपारी अडीच वाजता तिरंगी मालिकेतील पहिला सामना होणार आहे. खेळाडू लवकर ट्वेंन्टी-20 स्पर्धेतून एकदिवसीय सामन्यांत एकरूप होण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
|