भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीस संघात संघर्षपूर्ण परतीसाठी आशियन क्रिकेटर व आशियन बॅटसमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथे कॅस्ट्रॉल आशियन क्रिकेट अवार्डस समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सचिन तेंडुलकरचा सवौत्कृष्ट एकदिवसीय फलंदाजासाठीचे नामांकण मिळाले होते तर गौतम गंभीरने ट्वेंटी मधील सवौत्कृष्ठ फलंदाजाचा पुरस्कार पटकावला.
श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकाराने वर्षातील कसोटी फलंदाजाचा मान पटकावला, तर फरवेझ महारूखला सवौत्कृष्ट एकदिवसीय गोलंदाजाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गांगुली समारंभास उपस्थित नव्हता, त्याची पत्नी डोनाने त्याचा पुरस्कार स्वीकारला.
|