मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आताच संन्यास नाही- जयसुर्या  Search similar articles
जगभरातील गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसुर्या रविवारी 39 व्या वर्षात पदार्पण करत असून, आताच आपण संन्यास घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

सध्या आपले संपूर्ण लक्ष आपण खेळावर केंद्रित केले असून, आपल्यात आणखी खूप क्रिकेट बाकी असल्याचे तो म्हणाला. मला माझ्या भविष्याची मुळीच चिंता नाही. जोपर्यंत माझ्यात खेळ बाकी आहे, आणि मी फिट आहे, तोपर्यंत मी खेळतच राहील असेही त्याने स्पष्ट केले.

आपीएलचे सुरुवातीचे काही सामने वगळता जयसुर्याने नंतरच्या सामन्यात केलेल्या फटकेबाजीने क्रीडा प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते. आयपीएलमध्ये त्याने 500 धावा ठोकल्या होत्या.
आणखी
गांगुली ठरला आशियन क्रिकेटर
पठाणचे बांगलादेशविरूद्ध खेळणे अनिश्चित
तिरंगा न फडकाविल्‍याची चौकशी
भारताचा पाकवर वेगवान विजय
विजयासाठी भारतापुढे तीनशे धावांचे आव्हान
कपिल 'सेव्ह द गर्ल चाइल्ड' चा ब्रँड एम्बेसिडर