मांडीच्या दुखापतीमुळे आशिया स्पर्धेतून माघार घेतलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आयसीसी क्रमवारीतील मानांकनात घसरण झाली असून तो दुसर्या क्रमांकावर गेला आहे. त्याचवेळी कर्णधार एम.एस.धोनीने मोठी झेप घेताना चौथे स्थान पटकावले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ ७९२ गुणांकासह पहिल्या स्थानावर असून सचिनचे गुणांक ७५८ आहेत. धोनीने आशिया करंडकात आतापर्यंत १३५ धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटींग व माईक हसीसमवेत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या विसात भारताचा युवराज सिंग चौदाव्या आणि गौतम गंभीर विसाव्या क्रमांकावर आहे.
संघांच्या क्रमवारीत भारतीय संघाचे स्थान चौथे आहे. न्यूझीलंड तिसर्या क्रमांकावर आहे. सध्या सुरू असलेला आशिया करंडक जिंकला तर भारत तिसर्या स्थानावर जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे १२८ व १२७ गुणांकासह पहिल्या व दुसर्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडची घसरण झाली असून हा संघ सातव्या स्थानावर गेला आहे. श्रीलंका सहाव्या क्रमांकावर असून सगळ्यात शेवटी वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे.
|