पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला घटवण्यात आलेली अठरा महिन्यांची बंदीही मान्य असून त्याने लाहोर उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याच्यावर गैरवर्तणुकीसाठी पाच वर्षाची बंदी घातली होती. मंडळाने नियुक्त केलेल्या लवादाने त्याची बंदी अठरा महिन्यापर्यंत घटवली होती. याशिवाय त्याच्यावर सात मिलियन रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
मात्र अख्तर लवादाच्या निर्णयावर समाधानी नसून त्याने बंदी फेटाळून लावण्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
|