मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बर्थडे बॉयच्या झंझावातात बांगलादेशची वाताहत  Search similar articles
श्रीलंकेचे वादळ फायनलमध्ये दाखल
वेबदुनिया
एकोणचाळीस वर्षाच्या बर्थडे बॉयने आकर्षक पूल, कटस व कव्हर ड्राइव्हजी बरसात करत पच्चावन्न चेंडूत शतक झळकल्याने श्रीलंकेने एकशे अठ्ठ्यान्यव धावांच्या विजयासहित आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यातही प्रवेश निश्चित केला.

संगकाराने रविवारी पाकविरूद्ध सुरेख शतक झळकवण्यास चोवीस तास होण्याअगोदरच बांगलादेशविरूद्ध शैलिदार शतक झळकवून अवघ्या सत्तावीस षटकात श्रीलंकेच्या दोनशे धावा फळ्यावर लावल्या. सोळा चौकार व सहा षट्कारांच्या आतषबाजीने अवघ्या 88 चेंडूत 130 धावा तडकवणाऱ्या जयसुर्यास सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

तीनशे बत्तीस धावांचा डोंगर रचल्यानंतर मुरलीधरणने मैदानावर फिरकीची जादू बिखरत दहा षटकात 31 धावा देत पाच बळी घेऊन बांगलादेशची फलंदाजी कापून काढली. त्याने सुरेख मिश्रण करत 'दुसरा' या अस्त्राचा अचूक वापर केला.


बांगलादेशकडून नझीमुद्दीन 47 व रकीबुल हसन 52 धावा यांनीच थोडा प्रतिकार केला. बाकीच्या फलंदाजांनी अक्षरशः: नांग्या टाकत तंबूचा रस्ता धरल्याने अवघा संघ 38.3 षटकात 174 धावांवर बाद झाला. श्रीलंकेने तब्बल 156 धावांचा मोठा विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश करून आम्हीच करंडकाचे दावेदार असल्याचा संकेत दिला आहे.
आणखी
श्रीलंका दौर्‍यात विजयश्री खेचूच: कुंबळे
शोएबची बंदीविरूद्ध उच्च न्यायालयात धाव
सचिनची घसरण, धोनीला बढती
आशिया चषक वेळापत्रकाची तक्रार नाही- जयवर्धने
संककाराच्या खेळीने श्रीलंकेचा सहज विजय
सचिन दुसर्‍या स्थानी तर धोनी चौथ्या