मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी द. आफ्रिका पर्याय  Search similar articles
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पर्यायी यजमानपदासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले, की जर पाकिस्तान किंवा श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद स्वीकारण्यात अपयशी ठरले तर ही मालिका दक्षिण आफ्रिकेतही आयोजित केली जाऊ शकते. मात्र या स्पर्धेसाठी पाकिस्तान हीच पहिली पसंती आहे आणि मालिका यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्थे विषयीची बरीच कामे केली गेली आहेत.


जर मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळविण्याचा निर्णय घेतला गेला तर स्पर्धा जोहान्सबर्ग, सेंच्युरियन आणि पॉटशेफस्ट्रूम आदी ठिकाणी खेळविल्या जाऊ शकतात. दोन वर्षात एकदा खेळविली जाणा-या या मालिकेत यावर्षी कसोटी क्रिकेटची मान्यता मिळविलेल्या भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज या आठ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

पाकिस्तानमध्ये ही मालिका 11 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. मात्र तेथील सुरक्षा व्यवस्थेविषयी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने चिंता व्यक्त केली आहे.
आणखी
बर्थडे बॉयच्या झंझावातात बांगलादेशची वाताहत
श्रीलंका दौर्‍यात विजयश्री खेचूच: कुंबळे
शोएबची बंदीविरूद्ध उच्च न्यायालयात धाव
सचिनची घसरण, धोनीला बढती
आशिया चषक वेळापत्रकाची तक्रार नाही- जयवर्धने
संककाराच्या खेळीने श्रीलंकेचा सहज विजय