पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक ज्योफ लॉसन यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसार माध्यमांनी आशिया करंडकाच्या सुपर फोर स्पर्धांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार केला आहे.
श्रीलंकेने पाकिस्तानला 64 धावांनी पराभूत केल्यानंतर मूळच्या ऑस्ट्रेलियातील असलेल्या या प्रशिक्षकाने पत्रकारांबददल वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानीय प्रसार माध्यमांनी लॉसन यांचा निषेध करीत बहिष्कार केला आहे. भारतीय पत्रकारांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
लॉसन यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करतानाच स्पष्ट केले, की कुठल्याही विषयावर माध्यमांनी टीप्पणी करून नये. केवळ प्रश्न विचारा आणिमी केवळ मला वाटतील त्याच प्रश्नांची उत्तरे देईन.
यावर एका स्थानिक पत्रकाराने ''तुम्ही माध्यमांना आदेश देत आहात काय?'' असा प्रश्न विचारला असता लॉसन यांनी त्या पत्रकाराला इंग्रजी येत नसल्याची टीका केली. यानंतर त्यांच्यात व माध्यमांमध्ये तणाव वाढत गेला.
पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक व कर्णधार शोएब मलिक यांच्यातील मतभेदाबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे नाराजी केली. स्थानिक माध्यमांनी संघ निवड व संघाचे खराब कामगिरीबाबतही प्रश्न विचारल्याने दोन दिवसांपूर्वीच शोएबशी माध्यमांचा वाद झाला होता.
|