आशिया करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंतही पोचू न शकलेल्या आणि जलद गती गोलंदाजीची धार हरविलेल्या पाकिस्तानी संघात पुन्हा गोलंदाज मोहम्मद आसिफ यास पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने आसीफला संधी दिल्यानंतर जर आसीफवरील अंमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा सिध्द झाला तर ही पाकसाठी डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या महिन्यात आसीफला दुबई विमानतळावर आपल्या पाकिटात प्रतिबंधित पदार्थ ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला आशिया करंडक स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.
|