ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरक्षा कारणांवरून पाकिस्तानात होणार असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्याने या सामन्यांच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसीत) अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून आयसीसीच्या एका अधिका-याने भेट देऊन रावळपिंडी स्टेडियमची पाहणी करून तयारीची माहिती घेतली.
आयसीसीचे जनसंपर्क अधिकारी ब्रायन मर्गेट्रायड यांनी रावळपिंडी स्टेडियमचा दौरा करून येथे सुरू असलेल्या कामांबददल समाधान व्यक्त केला.
11 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणारी चॅम्पियन्स करंडक मालिका पाकिस्तानच्या कराची, लाहोर आणि रावलपिंडीत होणार आहे. रावळपिंडीत उपांत्य सामन्यासह पाच सामने खेळविले जाणार आहेत.
|