सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सवौत्कृष्ट समालोचकाचा पुरस्कार पटकावला आहे. क्रिकइंफो डॉट कॉमच्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
रवी रवी शास्त्री व चॅनल नाइनचे समालोचक रीची बेनॉड यांना उपयोगकर्त्यांनी अनुक्रमे दुसरी व तिसरी पसंती दिली आहे. टॉनी ग्रेग व जीऑफ बॉयकॉट हे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले. हर्षा भोगलने क्रिकेट समालोचणात जागतिक व्यासपीठावर झेंडे रोवले आहे.
कित्येक वर्षापासून त्याने हा लौकिक कायम ठेवला असून या पुरस्काराने त्यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब केले आहे. संकेतस्थळाच्या हजारो मतदानकर्त्यांत भारतीयांची संख्याही लक्षणीय होती. सर्वाधिक निष्पक्ष, मनोरंजनात्मक व सखोल विश्लेषणाची क्षमता, अशा तीन श्रेणीत उपयोगकर्त्यांनी मतदान केले.
|