मादक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळणा-या आयपीएलच्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिले आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत मोहम्मद आसीफ दोषी आढळून आला आहे. या वृत्तास आयपीएलचे अध्यक्ष्ा ललित मोदी यांनी दुजोरा दिला असून आयपीएलने नंतर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हा उल्लेख आहे.
आयपीएल स्पर्धे दरम्यान दिल्ली डेअर डेव्हील्सच्या मागणीवरून दोघा पाकिस्तानी खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हे खेळाडू कोण असावेत याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची आपल्याला काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले असून हा विषय बीसीसीआय व आयपीएलचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात कोणता खेळाडू दोषी आहे, हे बराच वेळ गुप्त ठेवण्यात आले होते. मात्र स्पष्ट नंतर तो खेळाडू पाकिस्तानचा मोहम्मद आसीफ असल्याचे आयपीएलने स्पष्ट केले आहे.. दिल्ली डेअर डेविल्सच्या मागणीवरून आसीफची डोपिंग टेस्ट घेतली गेली होती. या स्पर्धे दरम्यान 14 खेळाडूंच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
|