मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना  Search similar articles
एएनआय
श्रीलंकेविरूद्धच्या एकतीस जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघ रवाना झाला आहे. कर्णधार कुंबळेने संघाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

मात्र 1985 पासून श्रीलंकेत खेळलेल्या चार मालिकेतून फक्त एकच मालिका विजय भारतास शक्य झाला आहे. याअगोदरच्या 2001 मधील दौऱ्यात भारतास 2-1 ने पराभूत व्हावे लागले होते. संघात फिरकीपटू हरभजन सिंग परतला आहे.

पाच सामन्याच्या बंदीमुळे तो खेळू शकला नव्हता. मात्र एकदिवसीय संघाचा कर्णधार धोनीची अनुपस्थिती जाणवण्याच्या शक्यता आहे. अतिक्रिकेटमुळे त्याने विश्रांती घेणे पसंत केले होते.

शुक्रवारी श्रीलंका एकादश संघाविरूद्धच्या तीन दिवसाच्या सामन्याने दौऱ्याची सुरूवात होईल. पहिला कसोटी सामना कोलोंबोत 23 ते 27 जुलै दरम्यान, दुसरा 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान व तिसरा कोलोंबोत आठ ते बारा ऑगस्ट दरम्यान खेळण्यात येईल. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेस सुरूवात होईल.
आणखी
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ
ड्रग चाचणीत मोहम्‍मद आसीफ दोषी
हर्षा भोगले सवौत्कृष्ट समालोचक
आयसीसी अधिका-याकडून रावलपिंडी स्टेडियमची पाहणी
आसिफला अभयदान मिळण्‍याची शक्‍यता
विदेशी कोच नको रे बाप्पा