मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारताच्या विजयाची गांगुलीला खात्री  Search similar articles
भारतीय संघाचा माजी कप्तान सौरव गांगुलीला भारतीय संघ श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करून आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे उटटे काढणार अशी खात्री आहे.

श्रीलंकेत आल्यानंतर येथील माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गांगुलीने विजयाची पूर्ण खात्री असल्याचे सांगितले. आम्ही निश्चितच विजयी होऊन परतू असा विश्वास असल्याचे गांगुलीने माध्यमांना सांगितले.

saurav ganguly
PRPR
आमच्याकडे चांगला आणि संतुलित संघ आहे. प्रत्येक संघाविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला आहे. आणि त्यामुळे विजयी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असे गांगुलीचे म्हणणे आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना येत्या 23 जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. शुक्रवारपासून श्रीलंकन बोर्ड एकादशसोबत एनसीसी स्पोर्ट्स क्लब मैदानावर तीन दिवसांचा सराव सामना खेळला जाणार आहे.
आणखी
कसोटी क्रिकेट खेळाडूंसाठी आव्हानच: कुंबळे
आसीफची कारकिर्द अडचणीत
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ
ड्रग चाचणीत मोहम्‍मद आसीफ दोषी
हर्षा भोगले सवौत्कृष्ट समालोचक