इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ याने भरपूर क्रिकेट खेळायचे असून अजूनपर्यंत आपण सर्वोच्च कामगिरी नोंदवायची असल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत तो संघात परतणार आहे.
दुखापत व शस्त्रक्रियेनंतर गेल्या अठरा महिन्यांपासून त्याचा समावेश अनिश्चित आहे. त्याने 2003 ते 2005 दरम्यानच्या कालावधीत इंग्लंडसाठी दमदार प्रदर्शन केले आहे.
कोणत्याही खेळपट्टीवर त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करतानाच इंग्लंडसाठी खोऱ्याने धावाही काढल्या. संघात परतणे म्हणजे नवीन सुरूवात करण्यासारखेच आहे. याअगोदर कसोटी खेळण्यास खूप कालावधी झाला आहे.
यादरम्यान नवीन प्रशिक्षकासोबतच नवीन खेळाडूही आले आहेत. मात्र आपण जोरदार पुनरागमन करू, याबाबत त्याने आशावाद व्यक्त केला आहे.
|