ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या वर्षी 7 मार्चपासून सुरू होणारा महिला क्रिकेट विश्व करंडकात भारतीय संघाचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. या मालिकेतील जगातील आठ महिला संघ सहभागी होणार असून 6 ठिकाणी हे सामने होणार आहेत.
विश्व करंडक मालिकेसाठी संघांचे विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. गट 'अ'मध्ये ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंण्ड, वेस्टइंडीज आणि द. आफ्रिका संघांचा समावेश असणार आहे. तर ब गटात भारत, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान संघ सहभागी होणार आहेत.
उर्वरित 6 संघांचा निर्णय 2005 च्या विश्व करंडक स्पर्धे दरम्यानच्या त्यांच्या कामावरून ठरविला जाणार आहे. महिला विश्व करंडक स्पर्धा 1973 पासून सुरू झाली होती. 2009 मध्ये होणारा ही नववी स्पर्धा असणार आहे.
|