धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराजचा कसोटी संघात समावेश नसलातरी कारकीर्दीच्या टप्प्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचे त्याचे स्वप्न आहे. क्रिकेट आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे स्पष्ट करून शेवटचे स्वप्न हे कर्णधारपद भूषवण्याचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.
युवराज एकदिवसीय संघाचा कर्णधार असल्यानंतरही काही कारणांनी तो त्याच्याकडे कर्णधारपद येऊ शकले नाही. राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले त्यावेळी आपली कामगिरी जोरात होती.
आपण चांगला खेळ करत नव्हतो, असे टीकाकार म्हणू शकत नाही, असे त्याने 'पीपल' मॅगझिनला सांगितले. मैदानाबाहेर आपण काय करतो याबाबत लोकांच्या निष्कर्षाशी तो सहमत नाही.
पार्ट्यांमध्ये आपणास रस असून त्यामुळे जोपर्यंत क्रिकेटवर परिणाम होत नाही तोपर्यंत ते मान्य करण्यास आपणास अडचण नाही, असे तो स्पष्ट करतो.
|