मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चॅम्पियन्स करंडकाच्या ठिकाणाबात अनिश्चितता  Search similar articles
भाषा
पाकिस्तानने चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याबाबत अनिश्चिततता कायम असून मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने प्रश्न मंडळाकडे सोपवला असून आठवडाभऱ्यात याप्रकणी निर्णय होईल.

आयसीसीच्या सुरक्षा सल्लागाराने आठ सहभागी देश व खेळाडूंच्या प्रतिनिधींना सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. याशिवाय नुकत्याच झालेल्या आशिया करंडकासाठी पाकिस्तानने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही अवगत करण्यात आले.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशिया करंडकादरम्यान उच्चस्तरीय सुरक्षा प्रदान केली व चॅम्पियन्स करंडकासाठीही सुरक्षेत ते हयगय करणार नाहीत. मात्र पीसीबीच्या मर्यादेबाहेरच्या धोक्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये एवढ्यात ओळीने झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात स्पर्धेच्या आयोजनामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुरक्षेच्या कारणाने त्यांनी पाक दौराही पुढे रेटला आहे. मात्र खेळाडू हे दहशतवादाचे कधीही लक्ष राहिले नसल्याचे पाक मंडळाने स्पष्ट करून आशिया करंडकाच्या यशस्वी आयोजनाचा दाखला दिला आहे.
आणखी
आशिया कप स्पर्धेची चौकशी होणार
शोएबचे टोरंटो स्पर्धेतील खेळणे अनिश्चित
युवराजला भूषवायचेय भारताचे कर्णधारपद
महिला विश्व करंडकाचा पहिला सामना पाकिस्तानशी
अद्याप सर्वोच्च कामगिरी व्हायची आहे: फ्लिंटॉफ
इपीएलमध्ये झळकणार सचिन, धोनी, रिकी?