श्रीलंकेचे गोलंदाजीचे आक्रमण फक्त अजंता मेंडीसवर अवलंबून नसल्याने इतरांवर दुर्लक्ष करणे महागात पडेल, असा इशारा माजी कर्णधार राहुल द्रविडने दिला आहे.
मेंडीसपासून भारतीय फलंदाजांना सांभाळून राहावे लागणारच आहे मात्र दशकभरापासून श्रीलंकेच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मुरलीधरन व चामिंडा वास यांनी दुलर्क्षित करणे येणार नाही, असे त्याने स्पष्ट केले.
त्यांच्या चार किंवा पाच गोलंदाजांपैकी तो एक असेल मात्र फक्त त्याच्यावरच लक्ष केंद्रित करणे अशक्य असल्याचे त्याने स्पष्ट केले. दुखापतीमुळे मलिंगा बाहेर असल्यानंतरही श्रीलंकेचा मारा प्रभावी असल्याचे त्याने सांगितले.
|