वेस्ट इंडीजच्या ब्रायन लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड तोडण्यापेक्षा माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आज येथे दिली.
सचिन वेस्ट इंडीजच्या लाराचा 11 हजार 953 धावांचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यापासून केवळ 77 धावा दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात हा रेकॉर्ड तोडणे त्याला सहज शक्य आहे.
सचिन म्हणाला, की माझे काम केवळ संघासाठी चांगला खेळ करणे आहे. हा काही व्यक्तीगत सामना नाही. त्यामुळे रेकॉर्ड माझ्यासाठी महत्वाचा नाही. |
|