ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर यांस अव्वल स्थान दिले आहे. 'शेन वॉर्न्स सेंच्युरी' या त्याच्या आगामी पुस्तकात त्याने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूमध्ये सचिनने बाजी मारली आहे.
वॉर्नचे हे पुस्तक लंडनमद्ये उद्या प्रकाशित होणार आहे. वॉर्नच्या यादीत त्याचा पहिला कर्णधार ऍलन बॉर्डरचाही समावेश असून त्यास त्याने चौथे स्थान दिले आहे.
वेस्ट इंडीजच्या कर्टली अॅम्ब्रोजला तिसरे, महान फलंदाज लारा यास दुसरे तर सचिन तेडुलकरला वॉर्नने पहिली पसंती दिली आहे. माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांस सव्विसावे, व्हिक्टोरियानं ह्यूज यास अठरावे तर मार्क वॉ यास त्याने नऊवे स्थान दिले आहे.
या पुस्तकातील जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीत वॉर्नने ऐकेकाळचा सहकारी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रथला पाचवे स्थान दिले आहे. वॉर्नच्या यादीतील पहिल्या दहा क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक इयान हिली यांस दहावे, सद्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार रिकी पॉटींगला त्याने आठवे स्थान प्राप्त झाले आहे. |