मोहाली कसोटीत कर्णधार कुंबळेच्या समावेशाबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून याबाबत उद्या सामन्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
बेंगळूरू कसोटीत त्याच्या खांद्यास दुखापत झाली होती. सद्या बरे वाटत आहे मात्र सामन्यास अजूनही चोवीस तास असल्याने उद्याच निर्णय घेणार. मोहालीत कुंबळेने याअगोदर चांगली कामगिरी केली आहे.
येथे गोलंदाजी करणे आनंददायक असल्याचे सांगून येथे काही विक्रमही केले. उद्यापर्यंत ठिक होण्याबाबत त्याने आशा व्यक्त केली. त्याच्या तंदुरूस्तीबाबत अनिश्चिततेमुळे संघव्यवस्थापनास डावपेचांवरी प्रभाव पडला आहे.
खेळपट्टीचा अंदाज आणि तंदुरूस्तीकडे बघूनच निर्णय होईल, असे त्याने सांगितले. |