सचिनला रेकॉर्ड करूच देणार नाही अशी वल्गना करणा-या कांगारूंच्या नाकावर टिच्चून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने मोहालीच्या मैदानावर आपला बहुप्रतिक्षित विश्वविक्रम साजरा केला. सचिनच्या या विक्रमाबरोबर जागतिक क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवसीय सामन्यातही त्याच्याच सर्वोच्च धावा आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. सचिन विक्रम करणार.. करणार म्हणून त्याच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. नुकत्याच बंगरूळू येथे झालेल्या कसोटीत सचिन या रेकॉर्डच्या अगदी जवळ जाऊन बाद झाला होता. त्यामुळे मोहालीच्या मैदानावर सचिन हा रेकॉर्ड नक्कीच करेल अशीच सर्वांना खात्री होती. या रेकॉर्डमुळे सचिनच्या कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजार 953 धावा झाल्या आहेत. हा रेकॉर्ड बनविण्यासाठी सचिनला 152 कसोटींमध्ये 248 सामने खेळावे लागले. त्या तुलनेत ब्रायन लाराने १३१ कसोटीतच हा विक्रम केला. पण सचिनच्या दुखापतींनी बऱ्याचदा डोके वर काढल्याने सचिनला हा विक्रम करण्यासाठी जास्त कसोटी खेळाव्या लागल्या. सचिनच्या नावे यापूर्वीच एकदिवसीय सामन्याचा विश्वविक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 16 हजार 361 धावा केल्या आहेत. 417 एकदिवसीय सामन्यांपैकी 407 सामन्यांमध्ये खेळून सचिनने हा रेकॉर्ड बनविला आहे. याशिवाय सर्वाधिक कसोटी व एकदिवसीय शतकांचा विक्रमही त्याच्याच नावे आहे. सचिनचे अभिनंदन करा |
|