मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > सौरवनेही गाठला सात हजारांचा टप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सौरवनेही गाठला सात हजारांचा टप्पा
वेबदुनिया
मोहालीत सचिन तेंडूलकरने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला असतानाच सौरव गांगुलीनेही ७००० धावांचा पल्ला गाठला आहे. यादृष्टिने मोहाली कसोटी तमाम क्रिकेट रसीकांच्या स्मरणात राहिल. सौरवने १११ कसोटीत ४२.२२ एवढ्या सरासरीने हा टप्पा गाठला आहे.

सौरवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३११ सामन्यात २२ शतक झळकवत ११,३६३ धावा केल्या आहेत. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून स्वत:स सिद्ध करणार्‍या सौरवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने सद्या सुरू असलेली बॉर्डर-गावसकर मालिका त्याच्या कारकीर्दीतील शेवटची ठरणार आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
सचिनची विश्वविक्रमाला गवसणी
कुंबळेच्या खेळण्याबाबत अनिश्चितता कायम
कुंबळेची ऑस्ट्रेलियास शाब्दिक कोपरखळी
स्टुअर्टच्या माघारीने सीड्लचे पदार्पण निश्चित
पाकला चॅम्पियन्स करंडक घेण्यास परवानगी
ब्रेट ली निर्णायक गोलंदाजीबाबत आशावादी