ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडल्यानंतर 111 चेंडूंमध्ये 88 धावा ठोकणारा विक्रमदित्य सचिन 88 धावांवर बाद झाला.
बेंगलूरू कसोटीत अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर आज सचिनने जिद्दीने खेळ करत आपल्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला. आज सचिनने संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळ करत आपल्या चाहत्यांना खूश केले.
आपला विक्रम पूर्णं केल्यानंतर सचिनला सिंडलेने बाद केले. हेडनने त्याचा सुरेख झेल घेतला. सिंडले आपला पहिलाच कसोटी सामना खळत असून, सचिनची विकेट मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. |