मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित सचिन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित सचिन
भारतीय क्रिकेट रसिकांच्‍या गळ्यातला ताईत... त्‍यांच्‍या दृष्‍टीने जणू देवचं असलेल्‍या सचिन तेंडुलकरचे क्रिकेटसाठीचे योगदान अतिशय विलक्षण आहे. आपल्‍या दीर्घकाळच्‍या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक विक्रम आणि पुरस्‍कार आपल्‍या नावे केले आहेत. यासाठी त्‍याला अनेक पुरस्‍कारांनीही गौरविण्‍यात आले आहे.

2008: सचिन तेंडूलकरला भारताचा दुस-या क्रमांकाचा नागरी सन्‍मान 'पद्म विभूषण'ने गौरविण्‍यात आले.

2006: सुनील गावस्‍कर यांच्‍या 34 शतकांचा रेकॉर्ड मोडल्‍याबद्दल कॅस्‍ट्रॉल क्रिकेटींग अवॉर्ड समारंभात सचिनचा खास गौरव करण्‍यात आला.

2002: ओव्‍हलच्‍या मैदानावर सचिनने आपला शंभरावा कसोटी सामना खेळला.

2001: मर्यादीत षटकांच्‍या सामन्‍यात 10 हजारांचा टप्‍पा पार केल्‍याबद्दल सचिनला 'महाराष्‍ट्र भूषण' पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. तर मुंबई क्रिकेट असोसिएशननेही त्‍याला त्‍यासाठी 'रजत बॅट' देऊन गौरविले.

1999: सचिनला सन्‍मानाचा पद्मश्री पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

1998: कुपर अ‍ॅण्‍ड लिब्रॅण्‍डतर्फे सचिनला सर्वोच्‍च खेळाडू म्‍हणून गौरविण्‍यात आले.

1997: विस्‍डेनच्‍या 'क्रिकेटर ऑफ द इयर'मध्‍ये सचिनचा समावेश. विस्डेनतर्फे दुसर्‍या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान

1994: क्रिडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी दिला जाणारा भारत सरकारचा अर्जून पुरस्‍कार सचिनला बहाल करण्‍यात आला. 1961 मध्‍ये सुरू झालेल्‍या या पुरस्‍कारात सचिनला 50 हजार रुपये रोख आणि अर्जुनाचा ब्रांझची मूर्ती प्रदान करण्‍यात आली.

1991: भारत सरकारचा सर्वोच्‍च क्रिडा पुरस्‍कार 'राजीव गांधी खेल रत्‍न' देऊन सचिनला गोरविण्‍यात आले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
सचिनवर शुभेच्‍छांचा वर्षाव
सचिन 88 धावांवर बाद
सौरवनेही गाठला सात हजारांचा टप्पा
सचिनची विश्वविक्रमाला गवसणी
कुंबळेच्या खेळण्याबाबत अनिश्चितता कायम
कुंबळेची ऑस्ट्रेलियास शाब्दिक कोपरखळी