ट्वेंटी-20 क्रिकेट हे युवकांचा खेळ आहे. परंतु यामध्ये अनुभव व वरिष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन आवश्यक असते. एंकदरीत आयपीएलमध्ये अनुभवी खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे, असे मत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केले.
आईपीएलमध्ये मॅथ्यू हेडन, एडम गिलख्रिस्ट, शेन वार्न आणि अनिल कुंबळेसारखे निवृत्त खेळाडू यांनी चांगली कामगिरी केली. सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅप मॅथ्यू हेडनला मिळाली, तर गिलख्रिस्ट 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' ठरला. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार अनिल कुंबळेला मिळाला. आयपीएल दोनमध्ये त्याने 21 बळी घेतले. यावर बोलतांना कुंबळे म्हणाला,' ट्वेंटी हा युवकांचा खेळ आहे. यामुळे यात तंदुरुस्तीला महत्व आहे. संघात सहा, सात युवा खेळाडू असावे, परंतु अनुभवी खेळाडू दबावात चांगली कामगिरी करतात.' |