ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » बीसीसीआयमुळे पाकने यजमानपद गमाविले: मनी
 
भारतीय उपखंडात सन 2011 मध्ये होणार्‍या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयमुळे पाकिस्तानला गमवावे लागले. बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वेगळा पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीसीबीचे माजी अध्यक्ष एहसास मनी यांनी केला आहे.

बीसीसीआयने आपल्या आर्थिक शक्तीचा वापर करुन पाकिस्तानला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. बीसीसीआयपुढे आयसीसीसह कोणतीही संस्था टिकाव धरु शकत नाही. पाकमधील सामने सुरक्षेच्या कारणांमुळे रद्द केल्यावर ते तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे होती. परंतु भारताने या निर्णयास विरोध केला, असा आरोप मनी यांनी ‍केला आहे.
संबंधित माहिती शोधा