ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » भारत-पाक मालिका तुर्त अशक्य
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रमामुळे नजीकच्या भविष्यात भारत आणि पाकिस्तान मालिका होणे शक्य नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाज बट्ट यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेऊन भारत-पाक मालिकेसंदर्भात चर्चा केली. परंतु भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम पाहता ही मालिका सध्या शक्य नसल्याचे बीसीसीआयचे माध्यम समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

भारत सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळत आहे. त्यानंतर श्रीलंका दौरा आहे. तसेच आयपीएल स्पर्धाही होणार आहे. यामुळे भारत-पाक मालिका आयोजित करणे अशक्य असल्याचे श्री.शुक्ला यांनी सांगितले. मालिकेसंदर्भात भारत सरकारकडून परवानगी मिळाल्यावर सहा, सात महिन्यांनी यावर चर्चा होवू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा