ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » सचिन 17 हजारापासून सात धावा लांब
Feedback Print Bookmark and Share
 
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतरा हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. या कामगिरीसाठी त्याला आता सात धावांची गरज आहे. सोमवारी मोहालीत झालेल्या सामन्यात त्याने 40 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन हॉरित्झने सचिनला पायचीत केले. त्यावेळी तो सतरा हजारापासून सात धावा लांब होता. सचिन बाद झाल्याने क्रिकेटप्रेमी निराश झाले. तसेचपंच अशोका डिसिल्वा यांचा सचिनला पायचीत देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. टीव्ही रिप्लेमध्ये तो चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जात असल्याचे स्पष्ट झाले. सचिनने 434 सामन्यांत 44.23 च्या सरासरीने 16 हजार 993 धावा झाल्या आहेत. त्यात 44 शतकांचा समावेश आहे.
संबंधित माहिती शोधा