ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी विं‍डिज संघ जाहीर
Feedback Print Bookmark and Share
 
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघ जाहीर केला आहे. तसेच संघातील खेळाडू व बोर्डामध्ये वेतन व करारासंदर्भात सुरू असलेले वाद ही शांत झाले आहे. संघाचे नेतृत्त्व पुन्हा एकदा क्रिस गेलकडे सोपविण्यात आले आहे.

शिवनारायण चंद्रपाल, रामनरेश सरवन व ड्‍वेन ब्रेनो यांच्या सारख्या वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर एड्रियन बेरथ, केमर रोच व गेविन टोंगे या खेळाडूंचे पदार्पण झाले आहेत.

विंडीज संघ ऑस्टेलियाविरुध्द तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्‍यासाठी दौरा करणार आहे. पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी ब्रिसबेन येथे, दुसरा 4 डिसेंबरला एडिलेड येथे तर तिसरा सामना 16 डिसेंबरला पर्थ येथे खेळला जाणार आहे.

विंडिज संघ- क्रिस गेल (कर्णधार), एड्रियन बारेथ, सुले मान बेन, ड्‍वेन ब्रेवो, शिवनारायन चंद्रपाल, नरसिंह देवनारायन, ट्रेविस डॉवलिन, ब्रॅडन नैश, दिनेश रामदीन ल रवी रामपाल, केमर रोच, डेरेन सैमी, रामनरेश सरवन, जेरोम टेलर, गैविन टोंगे.
संबंधित माहिती शोधा