ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न
Feedback Print Bookmark and Share
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारी मालिका 2-2 अशी बरोबरीत आल्यामुळे गुरुवारी होणारा पाचवा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतीने त्रस्त असल्यामुळे सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी भारताचे यश हे फलंदाजांचा कामगिरीवर अवलंबून असणार आहे.

भारतीय संघात गौतम गंभीरचे पुनगरामन होवू शकते. मानेतील दुखापतीमुळे गंभीर चौथा सामना खेळू शकला नव्हता. हैदराबादमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याचे क्यूरेटरने सांगितले असून गोलंदाजांनाही मदत करणार असल्याचे म्हटले आहे. मालिकेत भारताच्या सालामी जोडीने मोठी धावसंख्या अजून उभारली नाही. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीने 25, 21, 37 आणि 40 अशी भागेदारी केली आहे. आता पाचव्या सामन्यात त्यांच्याकडून शतकी भागेदारीची अपेक्षा आहे. यामुळे गंभीर, युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैना यांना आक्रमक फलंदाजी करण्याची संधी मिळेल.
संबंधित माहिती शोधा