ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » 'सेहवाग वन डे मध्ये दुहेरी शतक करणार'
Feedback Print Bookmark and Share
 
भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने कसोटी सामन्याप्रमाणे एकदिवसीय सामन्यात फलंदाजी केल्यास तो दुहेरी शतक करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केला.

सेहवाग डावाची सुरवात धुवांधार करतो. परंतु तो मोठी धावसंख्या उभारु शकत नाही. याबाबत बोलताना गावकसर यांनी सांगितले की, सेहवाग कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे सुरवात करतो त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यात त्याने सुरवात करावी. त्याने आक्रमनाबरोबर धैर्यही ठेवावे. यामुळे तो मोठी धावसंख्या उभी करु शकेल. जर सेहवाग 40-50 षटकापर्यंत टिकला तर तो दुहेरी शतक सहज पूर्ण करेल.

सुरेश रैना याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे. तो दुसर्‍या संघाकडून खेळताना तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो, असे गावसकर यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा