ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ दुखापतग्रस्त

हेनरिक्स पाचव्या सामन्यातून बाहेर
हैदराबाद, बुधवार, 4 नोव्हेंबर 2009( 15:23 IST )
दुखापतीने त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलिया संघास अजून एक धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू मोएसिस हेनरिक्स हैदराबादमध्ये गुरुवारी होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही. आता ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ दुखापतग्रस्त झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा टिम पेन, जेम्स होप्स, ब्रेट ली आणि पीटर सिडलनंतर हेनरिक्स हा पाचवा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हेनरिक्सच्या स्नायूत दुखापत झाल्यामुळे पाचवा सामना तो खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याला तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोहालीत झालेल्या चौथ्या सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना हेनरिक्सला दुखापत झाली होती.