मोहालीतील घटनेनंतर टीम इंडियासाठी हैदराबादमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ मंगळवारी हैदराबादमध्ये दाखल झाला.
मोहालीत कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराजसह काही खेळाडू सुरक्षा रक्षकांना चकमा देवून बाहेर गेले होते. त्यानंतर सिकंदराबाद पोलिसांनी भारतीय खेळाडूंची सुरक्षा अधिक कठोर केली आहे. भारतीय खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये 50 सुरक्षा कर्मचारी ठेवण्यात आले आहे. आता खेळाडूंना न सांगता बाहेर जाता येणार नाही. खेळाडू बाहेर गेल्यावर तीन पोलिस व्हॅन त्यांच्या बरोबर असणार आहे. तसेच सामन्या दरम्यान दोन हजार सुरक्षा कर्मचारी स्टेडियममध्ये असणार आहे.